logo

नांदेड लोकसभेसाठी सकाळी 11 वाजेपर्यंत 20.85 टक्‍के मतदान



नांदेड दि. 26 –16- नांदेड लोकसभेसाठी मतदान आज 26 एप्रिल 2024 रोजी सकाळी 7 वाजेपासून सुरु झाले आहे. 16 नांदेड लोकसभा मतदारसंघात सकाळी 11 वाजेपर्यत सरासरी 20.85 टक्‍के मतदान झाले आहे.

आज शुक्रवार 26 एप्रिल रोजी नांदेड लोकसभेसाठी 18 लाख 51 हजार 843 मतदार आपला मतदानाचा हक्‍क बजावणार आहेत. यात 9 लाख 55 हजार 84 पुरुष तर 8 लाख 96 हजार 617 महिला तर 142 तृतीयपंथीयाचा समावेश आहे. नांदेड शहरी व ग्रामीण भागात सकाळपासून मतदान उत्‍साहात सुरु झाले असून अनेक बुथवर मतदारांच्‍या रांगा दिसून येत आहेत. यात वयोवृध्‍द, नवमतदार व सर्व गटातील मतदारांचा यात समावेश आहे.

16- नांदेड लोकसभेसाठी नांदेड दक्षिण मतदार संघामध्‍ये सकाळी 11 वाजेपर्यत सर्वाधिक 22.50 टक्‍के तर सर्वात कमी मुखेड मतदार संघात 18.74 टक्‍के मतदान झाले आहे. भोकर 21.81 टक्‍के, नांदेड उत्‍तर 20.22 टक्‍के, नांदेड दक्षिण 22.50 टक्‍के तर नायगाव 22.13 टक्‍के आणि देगलूर 19.74 टक्‍के, मुखेड 18.74 टक्‍के असे एकूण 20.85 टक्‍के मतदान झाले आहे.


2
1367 views